August 9, 2025

कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकासाचा बॅकलॉग विद्यमान संचालक मंडळ भरून काढेल- आ.कैलास पाटील.

  • कळंब – बाजार समिती आवारातील ढोकी रोड ते इंगळे गणपती व शेतकरी मशनिरी या सिमेंट रोडच्या कामाचे आ.कैलास पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
    प्रसंगी बोलताना आ.पाटील यांनी बाजार समीती संचालक मंडळाच्या कामकाजाचा लेखाजोखा सादर करुन चालु कामकाजाबद्दल आनंद व्यक्त केला.
    कृषी उत्पन्न बाजार समिती कळंबच्या स्थापनेपासून व्यापारी व शेतकरी वर्गास सोयी-सुविधा देण्याकरिता बाजार समिती कळंब कडून अनेक वेळा अन्याय झालेला आहे.यास तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार होते,तत्कालीन संचालक मंडळांनी बाजार समितीच्या विकासासाठी कोणत्याही नव्या योजना आमलात आवलिया नाहीत,बाजार समिती फक्त आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी चालवावी अशा पद्धतीने कामकाज केल्याने बाजार समितीचा कोणताही विकास मागील ३० वर्षापासून झाला नाही,हे आपले दुर्भाग्य आहे . बाजार समितीच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी सध्या आलेले संचालक मंडळ सक्षमपणे काम करत आहे, दिवस रात्र झटत आहे. विद्यमान मंडळाने बाजार समितीवर निवडून आलेल्या मागील आठ महिन्यापासून समितीच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे, कित्येक वर्षापासून थकीत असणारे भाडे वसूल करणे, शिराढोण उपबाजार पेठ सुरू करण्यासाठी सातबारा उताऱ्यापासून तेथील प्लॉट लिलाव, व गाळे लिलाव तसेच स्वाराश्य अभिरुची यासारखे उपक्रम राबवले आहेत. कळंब नगरपालिकेकडून रोड करून घेणे. आधी बाबींवर प्राधान्याने कामकाज सुरू केले असून लवकरच सगळ्यांना सकारात्मक बदल दिसून येणार आहे.
    बाजार समितीत ढोकी रोड ते इंगळे गणपती व शेतकरी मशनिरी पर्यंत नगरपालिका निधीतून रोडच्या रु ८१ लक्ष च्या कामाचे भूमिपूजन मा.आमदार कैलास पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानी बा.स.सभापती शिवाजी कापसे होते. बाजार समितीचे कामकाज हे शेतकरी वर्गाच्या हितासाठीच असणार अससल्याचे त्यांनी आवर्जून सांगत, मागील आठ महिन्याच्या कालखंडात बाजार समितीच्या खात्यावर लाखो रुपये जमा झाले असून यातून बाजार समितीच्या विकासाची कामे केली जातील, बाजार समिती ने वाटप केलेल्या पाणी पुरवठाच्या जागेवर पाच माजली इमारतीच्या व २४० गाळ्यांची उभारनी करणार असल्याचे नियोजित आहे. सदर इमारतीत गाळे, शेतकरी निवास,हमाल भवन, व्यापारी भवन,शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वस्तीगृह,बँक, कार्यालय आदी बाबी असणार आहेत. सदर जागेतील लोकांनी यासाठी सहकार्य करावे असे अवाहन केले.अंतर्गत रस्ते,लिलाव ओटा आदी बाबतही प्राधान्याने कामकाज सुरू आहे.असे त्यांनी सांगितले.
    प्रसंगी संचालक भारत नाना सांगळे, संचालक लक्ष्मण कोल्हे,संचालक रोहन पारख,संचालक तुषार वाघमारे,दिलीप पाटील,मुस्ताक कुरेशी, संचालक हरिचंद कुंभार, माजी संचालक कांतीलाल बागरेचा, शशिकांत फाटक, व्यापारी असो. अध्यक्ष नंदकिशोर मोरे, अजय जाधव, विजय गुंजाळ, नाना खबाले, सागर बाराते, सचिन पवार,संजय होळे, कवडे, माझी सभापती तात्यासाहेब थोरबोले, माजी सभापती भागवत धस, आनंद बलाई,राहुल देवळकर, बलदोटा पत्रकार सतीश टोणगे, दिलीप गंभीरे,सागर बाराते, सचिन काळे, अशोक जगताप, चेतन वाघमारे, बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ व सर्व कर्मचारी बांधव उपस्थित होते.
error: Content is protected !!