
कळंब (जयनारायण दरक) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी आयोजित, कळंब यांच्या वतीने सन २०२३-२४ मधील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर स्मृती व्याख्यानमाला ह्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे.
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर स्मृती व्याख्यानमालेचे १२ वे वर्ष आहे. शहरातील वैचारिक नागरिकांसाठी ही व्याख्यानमाला सुरू करण्यात आली असून दरवर्षी या दिवसात प्रचंड थंडी असतानाही श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
तीन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत सोमवार (ता.२५) रोजी सायंकाळी ७.०० वाजता करमाळा येथील डॉ. संजय चौधरी हे
व्याख्याते उपस्थित राहणार असून “वारकरी संतांचा लढा- लढण्याची गरज” हा त्यांचा विषय आहे. मंगळवार (ता.२६) रोजी सायंकाळी ठरलेल्या वेळी नांदेड येथील व्याख्याते डॉ. विश्वाधार देशमुख हे असणार असून त्यांचा विषय “भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे” हा आहे. बुधवार (ता.२७) रोजी
धाराशिव येथील व्याख्याते प्रतिक गायकवाड यांचे “महापुरुषांचे सामाजिक परिवर्तनात योगदान” या विषयावर असणार आहे.
या तीन दिवसीय व्याख्यानमालेसाठी श्रोत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर चँरिटेबल ट्रस्टचे डॉ.अशोकराव मोहेकर , प्राचार्य डॉ.सुनिल पवार व रोटरीचे पदाधिकारी यांनी केले आहे.
More Stories
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”
कळंब बाजार समितीचे ४६ गाळे फक्त खुल्या लिलावातूनच
“जगाला युद्धाची नव्हे,बुद्धाची गरज” – बौद्धाचार्य सुनील गायकवाड