August 9, 2025

ज्ञान प्रसार विद्यालयात उद्योजकता विकास याविषयी मार्गदर्शन

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य संजय जगताप यांच्यामार्गदर्शनाखाली इंडसइंड बैंक यांच्या सामाजिक दायित्व निधी अंतर्गत वॉटर संस्था, संपदा ट्रस्ट यांच्याद्वारे ग्रामीण समूदाय समग्र विकास कार्यक्रम अंतर्गत ज्ञान प्रसार उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना संपदा ट्रस्टचे जिल्हा व्यवस्थापक विकास गोफणे यांनी उद्योजकता विकास याविषयी सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आज शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी तसेच युवतींसाठी विविध योजना तसेच प्रशिक्षण राबवले जातात. विविध जाती जमाती तसेच मागासवर्गीय समाजबांधवांसाठी वेगवेगळी विकास महामंडळे काम करत असून याअंतर्गत विविध कर्ज तसेच त्यावरील सबसिडी याविषयी त्यांनी माहिती दिली. आजच्या युवा वर्गाने कौशल्य विकास करून आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याप्रसंगी मोहाचे उपसरपंच बशारत मोमीन, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर, वॉटर संस्थेचे रुपेश उमरदंड, प्राचार्य संजय जगताप तसेच महिला बचत गटाच्या तस्लिम पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शेखर गिरी यांनी केले तर आभार प्रा. नवनाथ करंजकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.राहुल भिसे, प्रा. कोकाटे , प्रा. श्रीमती प्रतिभा सावंत आदींनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!