तुळजापुर – केंद्र शासनाच्या वित्तीयसाह्य योजनामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळत असल्याचे प्रतिपादन तुळजापुरचे आमदार राणा जगजितसिंह पाटिल यांनी केले.विकसित भारत संकल्प यात्रादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदृष्यप्रणालीच्या माध्यतातून देशभरातल्या लाभार्थ्यांशी साधलेल्या संवादाचे थेट प्रसारनाचे आयोजन तुळजापुर तालुक्यातील हंगरगा गावामध्ये करण्यात आले होते. यावेळी राणा पाटील बोलत होते. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती गावोगावी पोहोचवणारी विकसित भारत संकल्प यात्रा आज हांगरगा नळ गावात पोहचली होती.
यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने, तहसिलदार अरविंद भोळंगे, गट विकास अधिकारी अमोल ताकभाते, सरपंच अतुल कलशेट्टी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, आणि क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
पाटील म्हणाले प्रत्येक महिला केंद्र शासनाच्या अनेक योजनाचा लाभ घेऊन आपले कुटुंब आथिर्क दृष्ट्या सक्षम करत आहेत. गावागावात जाऊन प्रत्यक्ष लाभार्थी शोधून विश्वकर्मा योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत जिल्ह्यात अनेक महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगारक्षम बनत असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे यांनी दिली.
यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणारे स्टाँल लावण्यात आले होते. तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर भरवण्यात आले होते.कार्यक्रमास मोठया प्रमाणात ग्रामस्थ आणि विविध विभगाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश