धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.14 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 202 कारवाया करुन 1,55,500 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
परंडा पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)संदीप सनातन पांउगळे, वय 35 वर्षे, रा. इंदीरानगर झोपडपट्टी माढा ता. माढा जि. सोलापूर ह.मु. नालगाव ता. परंडा जि. धाराशिव हे दि.14.12.2023 रोजी 14.15 वा. सु. छत्रपती संभाजी चौक नालगाव च्या जवह असलेले सुहास करळे यांचे टपरीचे बाजूस मोकळ्या जागेत नालगाव येथे अंदाजे 900 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 9 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
धाराशिव ग्रामीण पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)सोनाली संतोष पवार, वय 24 वर्षे, रा. आळणी ह.मु. गडदेवदरी ता. जि. धाराशिव हे दि.14.12.2023 रोजी 13.40 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर मोकळ्या जागेत अंदाजे 900 ₹ किंमतीची 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
तुळजापूर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.14.12.2023 रोजी 16.30 वा. सु. तुळजापूर पो. ठा. हद्दीत धर्मशाळेजवळ समोर आठवडी बाजार कडे जाणारे रोडलगत तुळजापूर जि. धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)अजय प्रकाश जेटीथोर, वय 43 वर्षे, रा. भिमनगर तुळजापूर जि. धाराशिव हे 16.30 वा. सु. धर्मशाळेजवळ समोर आठवडी बाजार कडे जाणारे रोडलगत तुळजापू कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,000 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.14.12.2023 रोजी 14.30 ते 17.30 वा. सु. उमरगा पो. ठा. हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)इराण्णा शरणाप्पा आवटे, वय 42 वर्षे, रा. नंदी कॉलनी केएबी पावर हाउस जवळ गुलबर्गा ह.मु. कसगी ता. उमरगा जि. धाराशिव हे 14.50 वा. सु. कसगी बॉणडी येथील चौकात मिलन डे मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 11,290 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 2)सुधाकर नरसाप्पा शिंदे, वय 63 वर्षे, रा. नागोरा ता. जि. बिदर कर्नाटक ह.मु. उमरगा जि. धाराशिव हे 17.30 वा. सु. शहरात बसस्थानकाचे कंपांउंड लगत मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,250 ₹रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले.यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2गुन्हे नोंदवले आहेत.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
उमरगा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-वनिता बाळु भगत, वय 32 वर्षे, रा. जगदाळवाडी, ता. उमरगा जि. धाराशिव यांचेराहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 12.12.2023 रोजी 21.00 वा. सु. दि. 13.12.2023 रोजी 08.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील संदुकामधील रोख रक्कम 65,000₹, 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटरसायकल क्र एमएच 25 एई 4404 किंमत अंदाजे 30,000₹असा एकुण 2,75,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-वनिता भगत यांनी दि.14.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-सच्चिदानंद कल्याणराव आवटे, वय 36 वर्षे, रा. वडगाव ता. गेवराई जि. बीड हे ट्रॅव्हलसने प्रवास करत असताना दि. 13.12.2023 रोजी 20.00 ते 20.30 वा. सु. तेरखेडा येथील आरुष बिअरबार ते तेरखेडा दरम्यान अज्ञात व्यक्तीने ट्रॅव्हलच्या टपावर चढून बॅगमध्ये ठेवलेली रोख रक्कम 59,000₹व 15 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकुण 89,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सच्चिदानंद आवठे यांनी दि.14.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-गफार मैनोद्दीन मुलानी, वय 47 वर्षे, रा. सुरवसे पार्क विजापूर रोड सोलापूर हे व त्यांच्या पत्नी बसस्थानक धाराशिव येथे असताना अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे पत्नीचे पर्स मधील अंदाजे 60,000₹ किंमतीचे 34 ग्रूम वजनाचे सोन्याचे दागिने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गफार मुलानी यांनी दि.14.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-गुरुलिंग केरबा तेली, वय 52 वर्षे, रा. ओमनगर विठ्ठल रुक्मीणी मंदीरा समोर धाराशिव यांचे स्विफ्ट डिजायर क्र एमएच 14 डीएन 1624 चे चारही चाके(टायर) अंदाजे 12,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने दि. 13.12.2023 रोजी 23.00 ते दि. 14.12.2023 रोजी 01.30 वा. सु. फिर्यादी गुरुलिंग तेली यांचे राहाते घरासमोरुन चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गुरुलिंग तेली यांनी दि.14.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ फसवणुक.”
तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) विजय सुनिल बोदले, रा. शुक्रवार पेठ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.15.07.2023 रोजी 20.40 वा. सु. शुक्रवार पेठ तुळजापूर येथे श्री. तुळजाभवानी मंदीर प्रशानाची कसलीही परवानी न घेता श्री. तुळजापभवानी देवीजीचे नावाशी साधर्म्य असणारे एचटीटीपी:// उत्सव ॲपडाटइन/क्रिया/मा-तुलजा-भवानी-टेम्पल ऑनलाईन- पुजा या नावाचे संगणकीय सांधनांचा वापर करुन वेबबेस्ड व मोबाईल बेस्ड ॲप्लीकेशन तयार करुन श्री. तुळजाभवानी देवीजींचा फोटो व लोगो वापरुन ते श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानाचे अधिकृत ॲप असल्याचे भासवून त्यावरती भाविंकामार्फत वेगवेगळ्या पुजा करण्यासाठी भाविकांकडून पैसे घेवून भाविकांची व मंदीर संस्थानाची फसवणुक केली.अशा मजकुराच्या फिर्यादी- अनिल बापुराव चव्हाण, वय 57 वर्षे, व्यवस्थापक विद्युत श्री. तुळजाभवानी रा. श्री तुळजाभवानी मंदीर कॉर्टर तुळजापुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.14.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 417, 419, 420, भा.दं.वि.सं. सह कलम 66(सी), 66(डी) आय. टी. ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)संभाजी खंडु मगर, वय 49 वर्षे, रा. सांगवी काटी ता. तुळजापूर, जि. धाराशिव ह.तु. प्लॉट नं 70 राव कॉलनी प्रतिष्ठा अपार्टमेंट तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे, 2) गोवर्धन जनार्धन मगर, वय 57 वर्षे, रा. सांगवी काटी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 04.02.2020 ते दि.08.12.2020 पावेतो बार्शी येथील तुळजाभवानी इंन्टरप्रायजेस कंपनीचे टेलीफोन केबलच्या कामाची ऑर्डर दिली परंतु काम कोठे करायचे व कसे करायचे याबाबत काही न सांगता फिर्यादीस कामाच आमीष दाखवून खोटी बनावट वर्क ऑर्डर तयार करुन फिर्यादी व साक्षीदार यांचे कडून 7,50,000₹ खात्यावर वर्ग करुन घेवून काम न देता फसवणुक केली. वरुन मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय कोर्ट क्र 4 धाराशिव यांचे आदेश जा क्र फौजदारी /4503 दि. 11.12.2023 अन्वये सी आर पी सी 156 (3) अन्वये फिर्यादी- निळकंठ शंकरराव रणदिवे, वय 49 रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव ह.मु. महसुल कॉलनी, राजी गांधीनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.14.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 420, 406, 471, 467, 468 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) जेयश मोहन जाधव,2) संग्राम मोहन जाधव, 3) तात्या गैबु बोराडे, 4) गैबु बोराडे, 5) वंदाबाई मोहन जाधव, 6) मोहन जाधव सर्व रा. मातंगनगर तुळजापूर ता. तुळजापूर जि.धाराशिव यांनी दि.06.12.2023 रोजी 21.30 वा. सु. मीवजे हळदीकुकांचे कारखान्याचे समोर तुळजापूर येथे फिर्यादी नामे-कुमार शंकर पौळ, वय 21 वर्षे, रा. मातंगनगर तुळजापूर ता. तुळजापूर जि.धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून 3000₹चे आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- कुमार शंकर पौळ यांनी दि.14.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 427, 504, 506, 143, 147, 149 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)सुरेश काशिनाथ राठोड,2) जनाबाई सुरेश राठोड, 3) जयश्री सुरेश राठोड, तिघे रा. अंबेजवळगे ता. जि. धाराशिव यांनी दि. 12.12.2023 रोजी 20.00 वा. सु. पप्पु पडवळ यांचे शेताजवळ अंबेजवळगा येथे फिर्यादी नामे- माणिक लक्ष्मण चव्हाण, वय 53 वर्षे, रा. एमएस ई बी सबस्टेशन जवळ अंबेजवळगा ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु आमच्या घरावर बॅटरीचा उजेड का मारलास या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- माणिक चव्हाण यांनी दि.14.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)असिफ पठाण,2)सुरज कांबळे, 3) रोहीत चुंगे,4) ओम चौधरी, सर्व उमरगा ता.उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 12.12.2023 रोजी 22.00 वा. सु. जे.के.बार जवळ उमरगा येथे फिर्यादी नामे- लहु दिलीप जमादार, वय 21 वर्षे, रा. नळवाडी ता.उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी पानटपरीची उधारी न दिल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दांडापट्टा, हंटर व कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- लहु जमादार यांनी दि.14.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
“अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई.”
दि.14.12.2023 रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकास गुप्त बातमी मिळाली की, एक सिलव्हर रंगाची इनोव्हा कार ही अंबेजवळगे शिवारातुन अवैध गुटखा वाहतुक करीत आहे. त्यावर पथकाने लागलीच तेथे जावून समोरुन येणारे सिलव्हर रंगाची इनोव्हा वाहन क्र एम.एच. 14 व्ही 1642 हे पेट्रोलिंग दरम्यान थांबवून चेक केले असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. सदर वाहनाचा चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव निहाल माजिद काझी, वय 21 वर्षे, रा. खाजानगर गल्ली नं 22 धाराशिव ता. जि. धाराशिव असे सागिंतले त्यावर पथकाने सदर इनोव्हा व त्यातील मिळून आलेला 1) रजनीवास सुगंधीत पान मसाला किमंत अंदाजे 3,07,200, 2) प्रिमीयम झेड एल 1 जाफराणी जर्दा किंमत अंदाजे 76,800₹ एकुण 3,84,000 किंमतीचा माला सह वाहन क्र एम.एच. 14 व्ही 1642 सिलव्हर रंगाची इनोव्हा असा एकुण 8,84,000 ₹ किंमतीचा माल मिळून आलेने जप्त करुन मिळून आलेला माल व आरोपी नामे- निहाल माजिद काझी, वय 21 वर्षे, रा. खाजानगर गल्ली नं 22 धाराशिव ता. जि. धाराशिव यास ताब्यात घेवून आरोपी याचे विरुध्द पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे गुरनं 341/2023 भा.द.वि. सं. कलम 328, 272, 273, 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक गायकवाड करत आहे.
सदर कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. स्वप्नील राठोड, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री.गायकवाड, पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण यांचे पथकाने केली.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक