धाराशिव(जिमाका) राज्यात वसुलीवर प्रलंबित असणाऱ्या दस्तावर मुद्रांक शुल्क व दंडामध्ये माफी किंवा सवलत देण्यासाठी ” महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 ” राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2020 या कालवधीत निष्पादित केलेले आणि नोंदणीस दाखल केलेले किंवा न केलेल्या दस्तावरील मुद्रांक शुल्क आणि त्यावरील दंडामध्ये या अभय योजनेत सवलत देण्यात आली आहे. ही योजना 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 या दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात अर्ज करावा.अर्जाचा नमुना विभागाच्या igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक कार्यालयात उपलब्ध आहे. अभय योजनेविषयी सविस्तर माहिती विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.अधिक माहितीसाठी नजीकच्या सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय किंवा दुय्यम निबंधक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी आर.जी.जानकर यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात