कळंब – शहरातील पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवकांचा पूर्ण देशात संप चालू असून यामुळे अनेक लोकांचे पोस्ट कार्यालयातील पत्र,लग्नपत्रिका व विविध कार्यालयांतील पत्र-व्यवहार हे बंद पडले असून शासनाने डाक सेवकांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी चर्चा सर्वत्र होत आहे. डाक सेवकांच्या हे मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.डाक जी.डी.एस.समीतीने शिफारस केल्याप्रमाणे १२,२४,३६ सर्व वरीष्ठ जी.डी.एस.यांना अतिरीक्त वेतनवाढ देण्यात यावी,जीडीएस कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचारी घोषिक करणे,तसेच विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारी रजा, घरभाडे भत्ता, टीए/ डीए, पेंशन, मेडीकल सुविधा, शिक्षण भत्ता इ. सर्व सुविधा लागु कराव्यात,डॉ.कमलेशचंद्र कमेटीच्या सर्व सकारात्मक शिफारसी विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणे उदा. टीआरसीए दि. १-१-२०१६ पासुन सिनीयर/ज्युनियर बॅचिंग १२,२४, ३६ प्रमोशन, ग्रुप विमा ५ लाख जीडीएस ग्रॅज्युएटी ५ लाख, १८० दिवस रजा व रोखीकरण, वैद्यकीय सुविधा कुटूंबासहीत, एसडीबीएस वर्गणी ३% ते १०% पेंशन इ,आयपीपीबी, पीएलआय, आरपीएलआय, बचत ठेव, मनरेगा या सर्व कामासाठी कमीशन ऎवजी वर्कलोड मध्ये समाविष्ठ करावी, पदाच्या वर्कलोडनुसार नविन जीडीएसला टीआरसीए देण्यात यावा. उदा. बीपीएमला ५ तासासाठी रु.१४५००/- टीआरसीए देण्यात यावा,सर्व बीपीएमला बॅगाची नेआण,कॅश कन्व्हेन्स अशा अतिरीक्त कामाचा सी.डी.ए देण्यात यावा,सर्व कॅज्युएल लेबर्सना पोस्टल /आरएमएस मध्ये समाविष्ठ करुन घ्यावे, अव्यवहारीक कामाच्या टार्गेटसाठी व जीडीएसला मोबाईलच्या माध्यमातुन त्यांच्या इच्छेविरुध्द फेसबुक इन्सटाग्राम मधुन कामासाठी सक्ति करणे थांबवावेकुठलाही भेदभाव न ठेवता सर्वांनाच अनुकंपा नौकरी देण्यात यावी जसे विवाहीत,मुलगी यांना पण, प्रभाविपणे काम करण्यासाठी बी.ओ. मध्ये,आरआयसीटी डीव्हास ऎवजी लॅपटॉप, प्रिंटर, ब्रॉडबँड नेटवर्कची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी,मोफत आयपीपीबी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी. कळंब शहरातील पोस्ट कार्यालयातील अभिजीत धस, सुहास पवार,आकाश बिटे,अजय माळी,मोरे,कवडे,कुलकर्णी,शिरसठ, सुतार,कोळी हे डाक सेवकांनी काम बंद करून देशव्यापी संपास पाठींबा दर्शविला आहे.
More Stories
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका प्रा.सौ.अंजलीताई मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट