August 9, 2025

डॉ.ऋषिकेश सुभाष लाटे यांचा सत्कार

  • कळंब – बिक्कड सर मित्र परिवाराच्या व स्वप्नपूर्ती कन्स्ट्रक्शन च्या वतीने विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर कळंब चे मुख्याद्यापक सुभाष लाटे व ईटकूरच्या केंद्रीय मुख्याध्यापिका शारदा मुंडे यांचे चिरंजीव डॉ.ऋषिकेश लाटे याचा एम्. एस. सर्जन YMT आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल खारघर मुंबई येथे निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
    यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड,युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख सागर बाराते, कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे , डॉ. अभिजित जाधवर, डॉ. भगवंत जाधवर, डॉ.रमेश जाधवर ,सेनेचे माजी नगरसेवक मनोहर नाना हारकर , कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन राजेश ढेंगळे, कळंब पोलीस स्टेशन चे पोलिस काॅन्सटेबल मुंडे ,निशिकांत आडसुळ , प्रा.सचिन बोंदर, अशोक बिक्कड,हरिभाऊ मोरे विष्णू पाळवदे आर्किटेक्ट खरगपूर आयआयटी चे विद्यार्थी सूरज माने, गणेश पवार, ओम व ओजस जाधवर, विठ्ठल माने, अतुल गायकवाड, रामहारी चाटे यांनी मार्गदर्शक केले, आभार मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड आणि सूत्रसंचलन महादेव खराटे यांनी केले.
error: Content is protected !!