August 9, 2025

खेलो इंडिया महिला रग्बी स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात धाराशिव (अ) संघ विजेता

  • कळंब- पुणे बालेवाडी येथे संपन्न झालेल्या रग्बी इंडीया, स्पोर्ट्स ॲथोरिटी ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स यांच्या मान्यतेने होत असलेल्या खेलो इंडिया महिला रग्बी स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात धाराशिव (अ)रग्बी संघाने विजेतेपद संपादन केले.
    या स्पर्धेत धाराशिव ( अ) संघांने साखळी सामन्यात ईलेनॉर संघांचा 45-0व नाशिक संघांचा 15-0ने पराभव करत गटात अव्वल स्थान प्राप्त केले.
    क्वार्टर फायनलमध्ये मुंबई संघाला 55-0ने पराभव करत दिमाखात सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. अटीतटीच्या सेमीफायनलचा सामन्यात सातारा अ संघांचा 5-0ने पराभव केला.या सामन्यात वैष्णवी कोळी हिने ट्राय करत संघाला 5गुण मिळवून दिले. अंतिम सामन्यात धाराशिव च्या रणरागिणी भिडल्या त्या कोल्हापूर संघाबरोबर. हा सामना 15-0असा जिंकत विजेतेपदावर नाव कोरले. या सामन्यात धाराशिव ची कर्णधार प्रतिक्षा माळी (10-गुण)व अदिती राऊत (5गुण) कमावले व उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
    विजयी संघांना 50,000रुपयेचे पारितोषिक,मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
    विजयी संघांत 1)प्रतिक्षा माळी (कर्णधार)2) अदिती राऊत 3) ज्ञानेश्वरी शिंदे 4) सिध्दी डोंगरे 5)संध्या डोंगरे 6)शिवानी शिंदे 7) कल्याणी घुले 8)अंजली भराटे 9) साक्षी काटे 10)सुहाना आवाड 11) वैष्णवी कोळी 12)प्रतिभा तांबारे या खेळाडूंचासहभाग होता.
    या खेळाडूंना शरद गव्हार, अनिल शिंदे, निलेश माळी, राजाभाऊ शिंदे, बालाजी पवार,दत्ता ढोले यांचे मार्गदर्शन लाभले तर भास्कर चव्हाण सर, पांचाळ सर, बाळकृष्ण तांबारे सर,माजी सरपंच संतोष कस्पटे, प्रकाश अभंग, नितीन काटे, लक्ष्मण मोहिते तात्या, क्रीडाधिकारी श्रीकांत हरनाळे सर, कैलास लटके यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!