कळंब- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने कै.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती निमित्त उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे अभिवादन व रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम घेण्यात आला.यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कै.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस कळंब उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम पाटील ,ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ,भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य मकरंद पाटील,भाजप पक्षाचे वॉरियर्स प्रकाश काका भडंगे, अशोक क्षीरसागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी कै.लोकनेते गोपीनाथ गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवन कार्याविषयी आपले विचार व्यक्त केले कै.गोपीनाथराव मुंडे यांनी समाजातील वंचित पीडित घटकांच्या उन्नतीसाठी कार्य केले त्यांच्या विचार व कार्याची आपणास आज गरज असल्याचे सांगितले यानंतर डॉ. पुरुषोत्तम पाटील डॉ.शरद दशरथ , प्रकाश काका भडंगे ,मकरंद पाटील ,महादेव महाराज अडसूळ आनंत माळवदे ,मधुकर शीलवंत संतोष लोंढे ,अशोक चिंचकर, अशोक क्षीरसागर, निलेश पांचाळ रुग्णालयातील कर्मचारी ,जोशी ,बनसोडे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधवसिंग राजपूत यांनी तर कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे धाराशिव जिल्हा समन्वयक सचिन डोरले यांनी व आभार सामाजिक कार्यकर्ते बंडू आबा ताटे यांनी मानले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात