धाराशिव (जिमाका)–जिल्ह्यातील गरजू व पात्र सेवारत सैनिक,माजी सैनिक,वीरनारी / माजी सैनिक विधवा तसेच इतर नागरिकांना कळविण्यात येते की,इयत्ता ८ वी,९ वी,१० वी,११ वी,१२ वी, ITI पदविका,पदवी,वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या (पंचवीस वर्षांच्या खालील) विद्यार्थ्यांसाठी सैनिकी मुलांच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया दिनांक ५ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व भोजनाची उत्तम सोय करण्यात आलेली आहे.आजी/माजी सैनिकांच्या पाल्यांच्या हुद्यानुसार सवलतीचे दर आकारण्यात येतात. तसेच वसतिगृहात जागा शिल्लक असल्यास इतर नागरिकांच्या पाल्यांनाही प्रवेश दिला जातो.प्रवेश पुस्तिका वसतिगृह अधीक्षक यांच्याकडे उपलब्ध आहे. तरी माजी सैनिक,विधवा,आजी सैनिक तसेच इतर नागरिक ज्यांचे पाल्य वसतिगृहात राहू इच्छितात, त्यांनी आपले अर्ज वसतिगृह अधीक्षक,सैनिकी मुलांचे वसतिगृह, धारासूर मर्दिनी मंदिराजवळ, होमगार्ड ऑफिसच्या बाजूस, धाराशिव येथे सादर करून आपला प्रवेश निश्चित करावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, धाराशिव यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक ९५३०८१५५१४ / ७३००२३१०५० वर संपर्क साधावा.असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,धाराशिव यांनी कळविले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान