April 13, 2026

समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

  • कळंब – शिक्षण,समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९ वी जयंती शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
    ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा यांचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
    कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.कार्यालयीन कर्मचारी श्रीमती आंबीरकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
    आपल्या भाषणातून वक्त्यांनी सांगितले की,महात्मा फुले यांनी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी समाजातील स्त्रिया व वंचित घटकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोठा लढा उभारला.पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. समाजातील रूढी,परंपरा आणि विरोधाला न जुमानता त्यांनी शिक्षण,समता,बंधुता आणि न्याय या मूल्यांची जोपासना केली.
    कार्यक्रमास ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे संचालक डॉ.संजय कांबळे तसेच महाविद्यालयाचे प्रबंधक हनुमंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
    यावेळी प्रा.डॉ.डी.ई.गुंडरे,प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी,प्रा.डॉ.दत्ता साकोळे,प्रा.डॉ.ईश्वर राठोड,प्रा. समाधान चंदनशिवे,प्रा.डॉ.
    बालाजी वाघमारे,प्रा.बुधवंत,प्रा. राऊत,प्रा.मानेकर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी श्री.खरात, रमेश भालेकर,बालाजी डीकले, साजिद शेख, श्री.शेळके,जीवन वाघमारे उपस्थित होते.
    तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.राघवेंद्र ताटीपामुल,प्रा.डॉ.हेमंत चांदोरे,प्रा.एन. एम. अंकुशराव आणि बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनींची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
    कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्रबंधक हनुमंत जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
error: Content is protected !!