April 6, 2026

छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा स्पर्धेत धाराशिवचा ऐतिहासिक विजय;दमदार फलंदाजी-गोलंदाजीच्या जोरावर नांदेडवर मात

  • कळंब – छत्रपती संभाजीनगर महसूल विभागीय क्रीडा स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याच्या क्रिकेट संघाने पहिल्यांदाच ऐतिहासिक विजय मिळवत आपला ठसा उमटवला आहे.अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात नांदेड संघावर मात करत धाराशिवने विजेतेपद पटकावले.
    या यशामागे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे मार्गदर्शन तसेच कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले यांचे प्रभावी नेतृत्व निर्णायक ठरले.संघातील सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ करत हा अभूतपूर्व विजय साकार केला.
    अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना धाराशिव संघाने आक्रमक सुरुवात केली.रणधीर भोसले आणि रणदीप सूर्यवंशी यांच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर अवघ्या १२ षटकांत १४५ धावांचा भक्कम डोंगर उभा करण्यात आला.त्यांच्या तुफानी खेळीमुळे संघाला मोठी आघाडी मिळाली.
    त्यानंतर गोलंदाजी करताना धाराशिव संघाने शिस्तबद्ध मारा करत नांदेड संघाला १३४ धावांवर रोखले.जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,शरद मोटे आणि अनिकेत राऊत यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत टाकले.त्यांच्या प्रभावी कामगिरीमुळे नांदेड संघाला लक्ष्य गाठण्यात अपयश आले.
    या विजयामुळे धाराशिव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.हा विजय केवळ संघाचा नसून संपूर्ण जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
    धाराशिवच्या खेळाडूंनी दाखवलेली जिद्द,संघभावना आणि कौशल्य यामुळेच इतिहास घडला.
error: Content is protected !!