कळंब – कळंब नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१९ मार्च २०२६ रोजी शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यालयात त्यांचा उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ओम बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष लाटे यांच्या हस्ते संजय मुंदडा यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी संजय मुंदडा यांच्या कार्याचा गौरव करत,त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजकारण व स्थानिक विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. यावेळी जिल्हा फेडरेशन चेअरमन शंकरभाऊ वाघमारे, व्यावसायिक विकास हौसलमल, भैय्या भालेराव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवट शुभेच्छा व अभिनंदनाच्या वातावरणात झाला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी