September 20, 2026

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष बैठक

  • धाराशिव (जिमाका)– धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडणुका महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम,१९६१ मधील कलम ८३ तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष/उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समिती (सभापती/उपसभापती) (आरक्षण व निवडणूक) नियम १९६२ मधील तरतुदीनुसार विहित मुदतीत घेणे आवश्यक आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडीसाठी दि.२७ मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात येणार आहे.यासंदर्भात,महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम,१९६१ मधील कलम ८३ तसेच संबंधित नियमांनुसार जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आदेश जारी केला आहे.या आदेशान्वये विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी होणाऱ्या विशेष बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी,धाराशिव श्री.ओंकार देशमुख यांना पीठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे.
error: Content is protected !!