कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी “सक्षम महिला – सक्षम समाज” या विषयावर व्याख्यान व महिलांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून ओम बालरुग्णालय,कळंब येथील डॉ.संजीवनी जाधवर यांनी “सशक्त नारी – सशक्त समाज” या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांचे आरोग्य,आत्मविश्वास, शिक्षण आणि समाजाच्या प्रगतीत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत समाजात सकारात्मक बदल घडवून आणावेत,असे आवाहनही त्यांनी केले. प्रमुख उपस्थिती म्हणून सिनेट सदस्य प्रा.डॉ.संजय कांबळे यांनी महिलांच्या सशक्तीकरणाबाबत आपले विचार मांडताना महिलांनी आपल्या हक्कांची जाणीव ठेवून स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रयत्नशील राहावे,असे सांगितले. तसेच प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून त्यातील विचार समजून घेणेही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत भगवान होते.महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असून महिलांना सर्वच क्षेत्रांत समान संधी मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. यावेळी उपप्राचार्य डॉ.कमलाकर जाधव,प्रा.जयंत भोसले तसेच विशेष सहकार्य करणारे प्रबंधक हनुमंत जाधव यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात श्री ट्रेडर्स,कळंब येथील प्रो.नवनाथ अडसूळ यांच्या सौजन्याने महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.तसेच इनरव्हील क्लब ऑफ कळंबच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा भवर,सचिव डॉ.दिपाली लोंढे,डॉ.मिनाक्षी भवर व राजश्री देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक प्रा.अर्चना मुखेडकर यांना प्राप्त झालेल्या “नेशनस् प्राइड – वुमन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड 2026” बद्दल विशेष सत्कार करण्यात आला. प्रस्तुत कार्यक्रम समाजशास्त्र विभाग व आयक्यूएसीच्या वतीने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. दत्ता साकोळे यांनी केले. प्रास्ताविक डॉ.ईश्वर राठोड यांनी केले,तर आभार प्रदर्शन डॉ. मीनाक्षी जाधव यांनी केले. यावेळी डॉ.वर्षा सरवदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील
प्रा.पालके,श्री.शिंदे,श्री.मडके,श्री.भावे तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमामुळे महिलांच्या सबलीकरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.
More Stories
दादर रेल्वे स्थानकाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी’ नाव देण्याची मागणी; कळंब येथे लोजपा (रामविलास)चे धरणे आंदोलन
नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे पालकांचा विश्वास वाढवा; प्रवेशसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा – डॉ.अशोकराव मोहेकर
मच्छिंद्र दादा गायकवाड युवा प्रतिष्ठानची भीम जयंतीसाठी जय्यत तयारी;नियोजन बैठकीत कार्यकारिणीची निवड