कळंब – जागतिक महिला दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे एच.पी.व्ही.(ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश किशोरवयीन मुलींमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करणे व त्यापासून संरक्षण देणे हा आहे. यावेळी सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कळंब येथील नववीत शिकणाऱ्या १४ ते १५ वर्ष वयोगटातील कु. यशस्वी सावंत, कु.तनिष्का पिसे,कु. स्नेहल जगताप व कु.जागृती माने या विद्यार्थिनींनी मोफत एच.पी.व्ही. लस घेऊन शासनाच्या मोफत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.वाकुरे,श्रीमती सलगरे सिस्टर,श्रीमती गाढवे सिस्टर,श्रीमती कुलकर्णी मॅडम, श्री.शिकारे ब्रदर,गोसावी ब्रदर तसेच समर्थ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुलभा विष्णू शिंदे (भवर) उपस्थित होत्या. तसेच सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्वच्छता व आरोग्य विभाग प्रमुख श्रीमती प्रतिभा रामचंद्र गांगर्डे (भवर), स्काऊट गाईड कॅप्टन तथा इनरव्हील क्लब ऑफ कळंबच्या अध्यक्षा, यांच्यासह पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी शासनाच्या या आरोग्यदायी उपक्रमाचे स्वागत करत किशोरवयीन मुलींनी एच.पी.व्ही.लसीकरणाचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी