कळंब– कळंब तालुक्यातील लोहटा येथील घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार भाटशिरपूरा येथून विना रॉयल्टी वाळूचे वाटप करण्यात आले.घरकुल बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूचा खर्च कमी व्हावा व लाभार्थ्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने प्रशासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधताना वाळूची मोठ्या प्रमाणात गरज भासते. त्यामुळे शासनाने नवीन वाळू धोरण लागू करत घरकुल लाभार्थ्यांना विना रॉयल्टी वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयानुसार कळंब तालुक्यातील लोहटा गावातील लाभार्थ्यांना भाटशिरपूरा येथील वाळू घाटातून वाळूचे वाटप करण्यात आले. दरम्यान,कळंब तालुक्यातील ज्या घरकुल लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी घरकुल बांधकाम सुरू असल्याबाबतचे ग्रामपंचायत व गटविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र घेऊन तहसील कार्यालयातील गौणखनिज शाखेशी संपर्क साधावा,असे आवाहन कळंब तहसीलदार हेमंत ढोकले यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे. घरकुल लाभार्थ्यांना वापरासाठी भाटशिरपूरा,आवाडशिरपुरा, खोदला आणि पिंपळगाव (को) येथील वाळू घाटांमधून वाळू उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.या निर्णयामुळे घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
More Stories
जागतिक महिला दिनानिमित्त कळंबमध्ये महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन;सहभागासाठी प्रवेश विनामूल्य
१६ वर्षांच्या संघर्षाला न्याय : लखन गायकवाड कळंब नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष;आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन;विद्याभवन हायस्कूल कळंब येथे प्रतिमा पूजन