मोहा (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा संचलित ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा (कला,वाणिज्य व विज्ञान) येथे ‘जागतिक महिला दिना’चे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दि.१४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता हा कार्यक्रम उत्साहात साजरा होणार आहे. ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन लाईफ लाईन मल्टी स्पेशालिटी को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर लिमिटेड,मोहा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र,मोहा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार असून, तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिलांच्या आरोग्याची तपासणी व आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना आरोग्याविषयी जागरूक करण्याचा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. तसेच या कार्यक्रमात विद्यार्थिनींच्या सहभागातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. महिला सक्षमीकरण,शिक्षणाचे महत्त्व आणि समाजातील महिलांची भूमिका या विषयांवर आधारित नृत्य,गीत,भाषणे आणि अन्य कलाविष्कार यामधून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर महिलांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.त्यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळावी हा या सत्कारामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमास परिसरातील सर्व माता-भगिनी,महिला तसेच विद्यालयातील विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापक अविनाश मोरे तसेच सर्व शिक्षकवृंद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
More Stories
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
एनएमएमएसमध्ये ज्ञान प्रसार विद्यालयाचा झंझावात;३३ विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
ज्ञान प्रसार माध्यमिक विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन