March 13, 2026

पिंपळगाव (डोळा) येथील जावई विजयकुमार घोलप पाटील कळंब आगार व्यवस्थापकपदी

  • कळंब आगार व्यवस्थापकपदी विजयकुमार घोलप पाटील यांची नियुक्ती

    कळंब –महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कळंब आगार व्यवस्थापकपदी विजयकुमार घोलप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
    सन २०१५ पासून एस.टी. महामंडळात कार्यरत असलेले घोलप पाटील यांनी कोरेगाव, वडूज,दहिवडी,फलटण,करमाळा, पंढरपूर तसेच देवगड (कोकण) येथे प्रशासकीय कामकाज अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने सांभाळले आहे.
    देवगड (कोकण) येथून आता त्यांची कळंब आगार प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून लवकरच ते पदभार स्वीकारणार आहेत.त्यांच्या कार्यशैलीमुळे कळंब बसस्थानकातील नियोजन, शिस्त व प्रवासी सुविधांमध्ये निश्चितच सकारात्मक सुधारणा होईल,अशी अपेक्षा कळंब तालुक्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.
    विशेष म्हणजे विजयकुमार घोलप पाटील हे कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील सा. साक्षी पावनज्योतचे विशेष प्रतिनिधी राजेंद्र बारगुले यांचे जावई विशाल घोलप यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.
    त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!