August 9, 2025

आशा राऊत-सुरवसे यांना भारतभूषण पुरस्कार

  • कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनच्या संविधान दिन सोहळा निमित्त आशा राऊत-सुरवसे यांना भारतभूषण पुरस्कार दिल्ली येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. आशा राऊत-सुरवसे ह्या ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विद्याभवन हायस्कूलात उपक्रमशील शिक्षिका आहेत. त्यांना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण सर्वोकृष्ट शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
    नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब आँफ इंडिया येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी यापूर्वी ज्ञानद्योग विद्यालय येरमाळा व ज्ञान प्रसार विद्यालय मोहा येथे काम केले आहे.शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री पौर्णिमा भौमिक,राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या सुरेखा लांबतुरे,अशोक लांबतुरे,सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष एम.वेंकटेश्वर, दुष्यंतकुमार गौतम,डॉ.मनीष गवई आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,अध्यक्ष अनिल मोहेकर,उपाध्यक्ष प्रा. आबासाहेब बारकुल, मुख्याध्यापक विलास पवार, उपमुख्याध्यापिका पाटील एस. डी आदींनी अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!