August 9, 2025

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकुण ६३८ प्रकरणे निकाली

  • कळंब – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक ०९ डिसेंबर, २०२३ रोजी जिल्हा न्यायालय, कळंब या ठिकाणी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील लोकअदालतीमध्ये एकुण चार पॅनल तयार करण्यात आलेले होते. पॅनल क्रमांक एक साठी आर. के. राजेभोसले, जिल्हा न्यायाधीश-१ कळंब यांनी पॅनल प्रमुख तर अॅड. आर. ए. पाटील यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले तर पॅनल क्रमांक २ साठी श्री. एन. ए. इंगळे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, कळंब यांनी पॅनल प्रमुख तर अॅड. ए. एम. लांडगे यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले. तर पॅनल क्रमांक ३ साठी श्रीमती ए. सी. जोशी दुसरे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब यांनी पॅनल प्रमुख तर अँड.कु.डी.ए. कांबळे यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले. पॅनल क्रमांक चार साठी एम. ए. शेख तिसरे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब यांनी पॅनल प्रमुख म्हणून तर अँड. एच. पी. बोंदर यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले.
    सदरील लोकअदालतीमध्ये चार पॅनलकडील ठेवण्यात आलेल्या एकुण ३८८ दिवाणी प्रकरणांपैकी ९० दिवाणी प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. सदरील प्रकरणामध्ये मोटार अपघात विमा क्लेमच्या एकुण ३ प्रकरणात रक्कम रुपये २७,२५,०००/- (अक्षरी रुपये सत्तावीस लाख पंचेवीस हजार) तर रक्कम वसुलीबाबतच्या दरखास्तीच्या एकुण ६ प्रकरणामध्ये २९,४६,४९८/- (अक्षरी रुपये एकोणतीस लाख शेचाळीस हजार चारशे अठ्ठ्यान्नव) इतकी तर एका बॅंकेच्या दाव्यामध्ये रक्कम रुपये ९,४४,२२२/- इतक्या रकमेची तडजोड झाली. तसेच प्रलंबित विशेष दरखास्तीच्या एकूण ३ प्रकरणामध्ये रक्कम रुपये १२,५४,५६७/- (अक्षरी रुपये बारा लाख चोपन्न हजार पाचशे सदुसष्ठ) इतकी रक्कम वसुल झाली. तसेच विविध स्वरुपाच्या एकुण २०३ फौजदारी प्रकरणांपैकी एन. आय. अँक्ट १३८ ची ५ प्रकरणे मिटविण्यात आली, ज्यामध्ये रक्कम रुपये १९,१९,९७२/- (अक्षरी रुपये एकोणीस लाख एकोणीस हजार नऊशे बाहत्तर) इतक्या रकमेची तडजोड झाली. तर गुन्हा कबुलीच्या एकुण ३१ प्रकरणांपैकी १५ प्रकरणामध्ये रक्कम रुपये ९,४००/- (अक्षरी रुपये नऊ हजार चारशे) इतकी दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आणि अन्य स्वरुपाची एकुण २ फाैजदारी प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्याचप्रमाणे सदरील लोकअदालतीच्या दिवशी विविध बॅंका, ग्रामपंचायती, नगर परिषद, पतसंस्था अशा इतर कार्यालयांमार्फत एकुण ३७७६ दाखलपूर्व (प्री-लिटीगेशन) प्रकरणे सादर करण्यात आलेली होती, त्यापैकी बॅंकेच्या एकुण १६ दाखलपूर्व (प्री-लिटीगेशन) प्रकरणांमध्ये बॅंक यांचेमार्फत लोकअदालती दिवशी एकुण रक्कम रुपये ८,४०,०००/- (अक्षरी रुपये आठ लाख चाळीस हजार) इतकी रक्कम वसुल करण्यात आली. त्याचप्रमाणे लोकअदालतीच्या अनुषंगाने नगर परिषद कळंब यांचे वतीने एकुण ८४ प्रकरणांमध्ये रक्कम रुपये १४,४८,४९७/- (अक्षरी रुपये चौदा लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे सत्त्यान्नव) इतकी रक्कम नगर परिषद स्तरावर वसुल करण्यात आली. कळंब तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या एकुण ४२६ दाखलपूर्व (प्री-लिटीगेशन) प्रकरणांमध्ये संबंधित ग्रामपंचायतीमार्फत ग्रामपंचायत स्तरावर एकुण रक्कम रुपये ६,३१,४५७/- (अक्षरी रुपये सहा लाख एकतीस हजार चारशे सत्तावन्न) इतकी रक्कम लोकअदालतीच्या माध्यमातून वसुल करण्यात आल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-१ आर. के. राजेभोसले यांनी दिली. सदरील राष्ट्रीय लोकअदालत पार पाडण्यासाठी कळंब विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अँड. डी. एस. पवार व विधीज्ञ मंडळातील सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय लोकअदालत सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलिस प्रशासन यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!