धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.07 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 76 कारवाया करुन 64,800 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.” धाराशिव ग्रामीण पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)चंद्रकांत भुजंग गव्हाणे, वय 53 वर्षे, ता. जि. धाराशिव हे दि.07.12.2023 रोजी 18.00 वा. सु. सोनेगाव येथे जि. प. शाळेसमोर अंदाजे 2,430 ₹ किंमतीची गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे. परंडा पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)ज्योती दिपक पवार, वय 36 वर्षे, रा. काशिद गल्ली परंडा जि. धाराशिव या दि.07.12.2023 रोजी 12.30 वा. सु. काशिद गल्ली परंडा येथे आपल्या राहात्या घरा समोर अंगणात अंदाजे 2,160 ₹ किंमतीची 27 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर 2)आतुल गोकुळ नरसाळे, वय 30 वर्षे, रा. डोमगाव 1 ता. परंडा जि. धाराशिव हे दि.07.12.2023 रोजी 13.10 वा. सु. उोमगाव ते सोनारी जाणाऱ्या डोमगाव 1 मधील रोडलगत असलेल्या जगदंबा किराणा दुकानाच्या पाठीमागे अंदाजे 770 ₹ किंमतीची 7 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर 3)किसन विठ्ठल सुसलादे, वय 72 वर्षे, रा. मिठानगर रौड, मुलुंड इस्ट मुंबई ह.मु. जुनी पिइापुरी ता.परंडा जि. धाराशिव हे दि.07.12.2023 रोजी 16.15 वा. सु. जुनी पिठापुरी ते परंडा जाणारे रोडलगत किसनसुसलादे यांचे पत्रेचे शेडचे पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत अंदाजे 900 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 9 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. 4)महादेव रावसाहेब माळी, वय 39 वर्षे, रा. वांगी बु. ता. भुम जि. धाराशिव हे दि.07.12.2023 रोजी 14.30 वा. सु. वांगी शिवारात वारदवाडी ते भुम जाणारे रोडवर श्री हॉटेल येथील पत्राचे शेडमध्ये अंदाजे 880 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 9 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये परंडा पो ठाणे येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदविले आहेत.
तामलवाडी पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)जाबुवंत गुलाब काळे, वय 55 वर्षे, रा. सुरतगाव, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.07.12.2023 रोजी 20.20 वा. सु. सुरतगाव झोपउपट्टी वर आपल्या राहात्या घराच्या बाजूस मोकळ्या जागेत अंदाजे 1,700 ₹ किंमतीच्या 10 लि. गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 20 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
भुम पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)ताईबाई अंकुश पवार, वय 45 वर्षे, रा. इंदिरानगर भुम ता. भुम ह.मु. भोगलगाव,ता. भुम जि. धाराशिव हे दि.07.12.2023 रोजी 16.30 वा. सु. भोगलगाव ता. भुम येथील पत्राचे शेडच्या बाजूला अंदाजे 720 ₹ किंमतीची 12 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
लोहारा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)राहुल पंडीत जाधव, वय 29 वर्षे, रा. तावराज खेडा, ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.07.12.2023 रोजी 19.50 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्रएमएच 13 बीडी क्र 9586 ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात लोहारा रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये लोहारा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) भिमाशंकर कदम, 2)बबलु कदम, दोघे रा. चिंचोली, ता. तुळजापूर जि.धाराशिव यांनी दि.06.12.2023 रोजी 21.45 वा. सु. नळदुर्ग रोड भिमाशंकर गूरेज समोर तुळजापुर येथे फिर्यादी नामे-आर्जुन बाळासाहेब कोळी, वय 30 वर्षे, रा. हॅलीपॅड वायसी कॉलेज शेजारी ता.तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मोटरसायकल ऐकमेकांना चालवायला देण्या घेण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने उजव्या बरगडीवर मारहाण करुन जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- आर्जुन कोळी यांनी दि.07.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ रस्ता अपघात.”
उमरगा पोलीस ठाणे : जखमी नामे-आकाश शिवाजी घोटाळे, वय 24 रा. धाकटीवाडी, ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.02.12.2023 रोजी 12.30 वा. सु. एनएच 65 रोडवर साधना हॉटेल समोर मोटरसायकलवर उभा असताना मोटरसायकल क्र एमएच 25 उब्ल्यु 6495 चा चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून आकाश घोटाळे यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या आपघातात आकाश घोटाळे हे गंभीर जखमी झाले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आकाश घोटाळे यांनी दि.07.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 338 सह 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी