March 4, 2026

दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत रंगोत्सवाचा आनंद

  • कथले युवक आघाडीचा सामाजिक उपक्रम आठव्या वर्षीही उत्साहात
  • कळंब – कळंब येथील स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने येथील संत ज्ञानेश्वर मुकबधीर निवासी विद्यालय येथे जाऊन दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून यंदाही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे रंग फुलवण्यात आले.
    युवक आघाडीच्या सदस्यांनी विविध प्रकारचे रंग उधळत मुकबधीर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरावेत,या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यक्रम आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
    या प्रसंगी बाळासाहेब कथले, भाऊसाहेब शिंदे,यश सुराणा, पंकज कोचेटा,सुशील बलदोटा, ओंकार कुलकर्णी,गोविंद खंडेलवाल,अशोक फल्ले,नवनाथ पुरी,धर्मराज पुरी,मनोज शिंगणापुरे,संस्कार फल्ले,राहुल किरवे,रोहित किरवे,मनोज फल्ले, संकेत भोरे,विश्वजीत पुरी तसेच तळजाई प्रतिष्ठानचे सचिव शहाजी चव्हाण उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक बालाजी जाधवर व कथले युवक आघाडीचे सर्व सदस्य यावेळी सहभागी झाले होते.
    सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत साजरा केलेला हा रंगोत्सव परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
error: Content is protected !!