सामाजिक बांधिलकी जपत दिल्लीमध्ये अण्णा भाऊ साठे व सावित्रीबाई फुले जयंतीचे आयोजन
नवी दिल्ली – दलित महासंघाच्या दिल्ली प्रदेश प्रांत अध्यक्षपदी माननीय विक्रम सोळसे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.मूळ महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले विक्रम सोळसे हे गेली २५ वर्षे दिल्लीमध्ये स्थायिक असून सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्य करीत आहेत. सत्यशोधक विचारांचे पुरस्कर्ते असलेल्या विक्रम सोळसे यांनी दिल्लीमध्ये अण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे.तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचेही आयोजन करून सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला आहे.विशेष म्हणजे,अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने दिल्लीमध्ये साहित्य संमेलन आयोजित करण्याचा उपक्रमही त्यांनी यशस्वीपणे राबविला आहे. नोकरी व व्यवसाय सांभाळत मातंग समाजाच्या अस्मितेच्या प्रश्नांवर ते दिल्लीमध्ये सातत्याने कार्यरत असतात.नुकताच त्यांनी दलित महासंघात प्रवेश केला असून संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी त्यांच्यावर दिल्ली राज्याच्या प्रांत अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
More Stories
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर भारत जोडो अभियानाची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची सदिच्छा भेट
भारत सरकार तर्फे राष्ट्रीय सामाजिककार्य पुरस्काराने ॲड.अजय वाघाळे सन्मानित