August 9, 2025

राज्यस्तरीय सुतार समाजाच्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन

  • कळंब – धाराशिव जिल्ह्यातील सर्व सुतार बांधवांना,महिलांना व तरुणाना जाहीर आवाहन करण्यात येते की, रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ :०० वाजता फुटवाला धर्मशाळा ३३२ संतभूमी प्रदक्षिणा रोड आळंदी देवाची पुणे येथे होत असलेल्या राज्यस्तरीय सुतार समाज महामेळाव्यासाठी लाखोच्या संख्येने आपण उपस्थित रहावे या मेळाव्यात समाजातील तरुण उद्योजक आणि समृद्ध सुतार समाज घडवण्यासाठी विशेष मार्गदर्शन होणार आहे व त्या अनुषंगाने तात्काळ व गतीने विशेष काम केले जाणार आहे तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विषयावर प्रबोधन होणार आहे व त्याच्यावर तात्काळ विशेष पावले उचलले जाणार आहेत व गतीने कार्य केले जाणार आहे राज्य सरकार व केंद्र सरकारच्या अनेक योजनांची माहिती व पूर्तता यावर विशेष कार्य होणार आहे तसेच या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री व इतर शासकीय अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे तसेच आपल्या पुढच्या पिढीच्या करिता अकरा महत्त्वाच्या मागण्या शासनाकडून मंजूर करून घ्यायचे आहेत तेव्हा धाराशिव जिल्ह्यातील सुतार समाज बांधवांनी व महिलांनी व तरुणांनी लाखोच्या संख्येने या मेळाव्याला हजर राहावे असे आव्हान सचिन भैय्या डोरले सकल सुतार समाज समन्वय धाराशिव यांनी केले आहे.
error: Content is protected !!