August 9, 2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी भव्य रक्तदान शिबिर संपन्न

  • धाराशिव – शहरातील तांबरी विभाग येथे दि. ०६ डिसेंबर २०२३ रोजी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्याकमहापरिनिर्वाण दिनानिमित्त सामूहिक वंदना घेऊन विनम्र अभिवादन करून शिवसेना संपर्क कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
    तसेच रक्तदान शिबिर आयोजन नगरसेवक राणा भैय्या बनसोडे, राजेश गोवर्धन (महाराज)यांनी केले होते आणि सौजन्य रेणुका ब्लड बँकचे ऋषी चोले यांनी केले होते.
    याप्रसंगी महेश बिडबाग, बापू कांबळे, राहुल वाघमारे, किरण लष्करे,महेश कांबळे, विक्की ढेरे, शितल कांबळे,राकेश कांबळे, अभी काटे, सौरभ कांबळे इत्यादी व मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!