August 9, 2025

भौतिक सुविधांकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष

  • कळंब – नगर परिषदेच्या प्रशासकीय कारभाराला स्थानिक रहिवासी वैतागून गेले आहेत.
    सध्या शहरात सगळीकडे घाणीचे साम्राज्य झाले असून रोगराईला आमंत्रण देण्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
    सद्या कळंब शहरात घाणीचे साम्राज्य असून,शहरातील प्रत्येक भागात कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत.नाल्यांची सफाई केली जात नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.यामुळे डेंग्यू व मलेरियाची साथ वाढली असून लहान बालके,आबालवृद्धांना हा रोग झाल्याने शहरात चिंता वाढली आहे. शहर तात्काळ स्वच्छ करावे, नाल्यांची साफसफाई करावी,रोगांचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी.
    सार्वजनिक मुताऱ्या नसल्याने सार्वजनिक ठिकाणी मोक्याच्या जागी उघड्यावर लघुशंकेस जावे लागत आहे.
    नगर परिषदेच्या त्रासाला शासकीय कार्यालयेही आपली सुटका करू शकले नाहीत.
  • * घाणीच्या साम्राज्याचा एकात्मिक बाल विकास सेवेच्या कार्यालयाला विळखा
    बालवयात बाराखडी व अक्षरांची ओळख करून त्यांना सुसंस्कार,आरोग्याचे धडे देऊन देशाची आदर्श युवा पिढी घडविणाकामी मुख्य कामगिरी बजावणाऱ्या तालुका कार्यालयाचा कारभार कळंब नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे चालतोय घाणीच्या साम्राज्यात. आज देशाची युवा पिढी घडविण्या कामी ज्या बालमनावर बाराखडी अक्षरांची ओळख आणि त्यामाध्यमातुन त्यांच्यावर आई-वडिला नंतर अंगणवाडीच्या माध्यमातुन सर्वत्र अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतणीस ताई यांच्याकडुन सुसंस्कार,चांगल्या वाईट गोष्टींची जाणिव करून देवून त्या बालकांना चांगले जिवन आरोग्य जगण्याचे धडे दिले जातात त्यांचेच मुख्य ऑफिस म्हणजे तालुकास्तरावरील एकात्मिक बालविकास योजना कार्यालय सध्या घाणीच्या साम्राज्यात कारभार चालवतेय
    एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प कळंब यांच्या शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागाच्या कार्यक्षेत्रातील कामाची व्याप्ती पाहिली तर एकूण अंगणवाडी २५१ त्यापैकी मिनी ३२ व मोठ्या अंगणवाडी २१९ ,कार्यकर्ती २१९ ,मदतनीस २१९ ,मिनी कार्यकर्ती ३२, ३ ते ६ वर्षांची बालके, गरोदर, स्तनदा माता ,किशोरी मुली ज्यांच्या नियमित कार्यालयात वैयक्तिक लक्ष देवून राबता असतो अशी तालुक्याची सुमारे लाभार्थी संख्या १७ ते १८००० हजार अशी असुन या विभागाच्या माध्यमातुन शिलाई मशिन,पिठगिरणी, सायकल,संगणक अशा विविध योजनासह ,बालसंगोपन ,माझी कन्या भाग्यश्री योजना यांचे लाभार्थी यांची या कार्यालयात मोठी सदैव वर्दळ असुन अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती प्रस्ताव घेऊन येणारी मंडळी या अशा एक ना अनेक व्यक्ती सर्वांना या कचरा,दुर्गंधी आणि तळीराम दारुडे यांनी दारू ढोसुन रस्त्यावर टाकलेल्या बाटल्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो .
    अशा या प्रकारावर नगरपरिषद , विभागाचे तालुका स्तरावरील प्रशासनाचे वरिष्ठ विभाग, पोलीस प्रशासन आळा घालणार का ? याकडे कार्यालयातील अधिकाऱ्यांचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
  • # पूर्वी तक्रार केली तेंव्हा नगर परिषदेने घाणीचा कचरा उचलला होता परंतु आणखीन पुन्हा पूर्वीपेक्षा जास्त घाण याठिकाणी टाकण्यात आली आहे.
    कार्यालय वेळेतही अशी घाण टाकणारे घाण टाकत आहेत.
  • – वैशाली सांगळे
    प्रकल्प अधिकारी,कळंब
error: Content is protected !!