कळंब – आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या १४५ व्या पुण्यतिथीनिमित्त कळंब येथील साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रम भावपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याचा व विचारांचा आढावा घेत त्यांच्या सामाजिक समतेच्या, शौर्याच्या आणि क्रांतिकारक भूमिकेची आठवण करून दिली. समाजातील वंचित घटकांना संघटित करून स्वाभिमानाची जाणीव करून देण्याचे त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमास प्रा.संजय घुले, सुशील तिर्थकर,सिकंदर वैरागे, राहुल कांबळे,रोहित कसबे, धनंजय ताटे,लखन ताटे,साईनाथ कांबळे,शंकर ताटे,चिमण्या ताटे, तानाजी वैरागे,करण कसबे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिक अभिवादनानंतर लहुजी वस्तादांच्या कार्याला पुढे नेण्याचा आणि सामाजिक एकात्मता बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमामुळे परिसरात सामाजिक जागृतीचा संदेश पसरला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी