February 13, 2026

ॲड.गुंड,काळे,घोलप,पवार,सुर्यवंशी,सोनवणे यांना पवनराजे स्मृती गौरव पुरस्कार जाहीर

  • धाराशिव – उद्योग क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी व योगदान देणाऱ्या उद्योजकांना देण्यात येणारा पवनराजे स्मृती गुणगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.या पुरस्काराची घोषणा पवनराजे स्मृती गुणगौरव पुरस्कार समितीचे समन्वयक गणेश शिंदे यांनी केली आहे.
    सन २०२६ चे उद्योग क्षेत्रातील कामगिरीबद्दल पवनराजे स्मृती गुणगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.यामध्ये धाराशिव तालुक्यातील उद्योजक ॲड.व्यंकटराव गुंड,कळंब तालुक्यातील तांदूळवाडी येथील व सध्या पुणे स्थित असलेले सतिश काळे,वाशी तालुक्यातील येथील विजयकुमार घोलप, लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील गोविंद पवार,उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील अस्मिता सुर्यवंशी व धाराशिव तालुक्यातील झरेगाव येथील दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी मल्लिकार्जुन सोनवणे यांचा समावेश आहे.या पुरस्काराचे वितरण कै.पवन राजेनिंबाळकर यांच्या जन्मदिनी दि.१९ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आ. कैलास पाटील व माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदू भैया राजेनिंबाळकर यांच्या हस्ते खासदार संपर्क कार्यालयात करण्यात येणार आहे.त्यामुळे या पुरस्कार वितरण सोहळ्यास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
error: Content is protected !!