March 30, 2026

सा.साक्षी पावनज्योत तर्फे ग्राम महसूल अधिकारी शशिकांत यादव यांचा सन्मान

  • कळंब – दर रविवार हा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी साप्ताहिक सुट्टीचा दिवस असला तरी आपल्या कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांचा वेळ वाया जाऊ नये,या उदात्त भावनेतून कळंब तालुक्यातील तांदुळवाडी,खेर्डा,बोर्डा व शेळका धानोरा येथील महसूल विभागाचे कर्तव्यदक्ष ग्राम महसूल अधिकारी शशिकांत यादव व महसूल सेवक सुरजकुमार गायकवाड हे रविवारीही आपले शासकीय कर्तव्य बजावत असल्याचे प्रेरणादायी चित्र पाहावयास मिळाले.
    शेतकऱ्यांची कागदपत्रे,सातबारा उतारे,विविध दाखले व प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी त्यांनी सुट्टीच्या दिवशीही सज्जावर उपस्थित राहून कामकाज पार पाडले. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठ भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
    या पार्श्वभूमीवर तांदुळवाडी येथील तलाठी सज्जावर दि.१२ फेब्रुवारी २०२६ वार गुरुवार रोजी जावून बहुजनांच्या न्याय हक्कासाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी निर्भीड संपादक सुभाष द.घोडके यांच्या लेखणीने साकारलेले कळंब शहरातून प्रकाशित होत असलेल्या ‘सा.साक्षी पावनज्योत’च्या वतीने महसूल विभागाचे ग्राम महसूल अधिकारी शशिकांत यादव यांचा कार्यकारी संपादक अविनाश सुभाष घोडके यांनी त्यांना अंक देऊन गौरव केला.
  • यावेळी मित्रवर्य महसूल सेवक सुरजकुमार गायकवाड आदींची उपस्थिती होती.रविवारीही कर्तव्य बजावणाऱ्या या तलाठ्यांच्या कार्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळत असून,त्यांच्या सेवेचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
error: Content is protected !!