February 12, 2026

माजी प्राचार्य संजय भोसले यांना ‘संस्थामाता सुमनताई मोहेकर’विशेषांक सप्रेम भेट

  • कळंब – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक, गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम शिक्षण मिळावे या उदात्त ध्येयाने ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा या संस्थेची स्थापना करणारे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांचे कार्य आज २१ व्या शतकातही अखंडितपणे सुरू आहे.संस्थेचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव (दादा) मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे ज्ञानदानाची परंपरा जोपासली जात आहे.
    याच संस्थेचे श्री.माधवराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मातोळाचे सेवानिवृत्त प्राचार्य व परिसरातील सुशिक्षित बेरोजगार व शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य लाभावे,या उद्देशाने उभारण्यात आलेल्या मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंत मडके यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट लिमिटेड,मोहा या संस्थेचे संचालक संजय भोसले यांना निर्भीड संपादक सुभाष द. घोडके यांच्या लेखणीतून साकारलेले संस्थामाता कै.सुमनताई मोहेकर द्वितीय स्मृतिदिनानिमित्त प्रकाशित विशेषांक सप्रेम भेट देण्यात आला.
    दि.११ फेब्रुवारी २०२६ वार बुधवार रोजी विद्याभवन हायस्कूल,कळंब येथे मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या हस्ते भोसले सरांना विशेषांक प्रदान करण्यात आला.
    या प्रसंगी उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी,सहाय्यक शिक्षक कोल्हे,कार्यकारी संपादक अविनाश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या शैक्षणिक कार्याचा व दूरदृष्टीचा गौरव करण्यात आला.
    ग्रामीण भागात शिक्षणाची ज्योत अखंड पेटती ठेवण्याच्या त्यांच्या ध्यासाची आठवण उपस्थितांनी कृतज्ञतेने व्यक्त केली.
    विशेषांकाच्या माध्यमातून संस्थामाता कै.सुमनताई मोहेकर यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला असून,शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.शिक्षण,रोजगारनिर्मिती व सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधत संस्था ग्रामीण विकासाच्या दिशेने ठोस पावले टाकत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
error: Content is protected !!