कळंब – शहरातील कल्पना नगर येथे लिंम्बुनी बौद्ध विहार व माता रमाई चौकात माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी माता रमाई यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांचा संघर्ष,त्याग आणि समाजासाठी दिलेले योगदान याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यानंतर मान्यवर व युवकांनी सामूहिक बुद्धवंदना घेतली. परिसरातील नागरिक,युवक व ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतपाल बनसोडे,राहुल हौसलमल,बाळासाहेब हौसलमल, रोहिदास गायकवाड,बबलू गायकवाड,संदीप कांबळे,राहुल गायकवाड,संदीप सावंत,शरद धावारे,सार्थक गायकवाड,कृष्णा शेळके,मनीषा बनसोडे,गंगाबाई गायकवाड,नलीनी बनसोडे,चांदणी गायकवाड व नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी उपस्थितांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर
भीमनगरात माता रमाई जयंती उत्साहात;निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण व शहरातून भव्य मिरवणूक