February 7, 2026

कै.सुमनताई (माई) मोहेकर द्वितीय पुण्यतिथीनिमित्त मोहेकर महाविद्यालयात रक्तदान शिबिर

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब येथील एनसीसी विभाग व ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने, संस्थामाता कै.सुमनताई (माई) मोहेकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे राबविण्यात आलेल्या या उपक्रमात यंदा ५६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले.
    या शिबिराचे उद्घाटन ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती अमृता जाधव (सहदिवाणी न्यायाधीश, कळंब) उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या,“देशसेवेमध्ये एनसीसीचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमांतून समाजाचे देणे लागतो ही भावना जोपासली पाहिजे. युवकांनी सोशल मीडियाचा वापर विधायक व चांगल्या कामांसाठी करावा.”
    यावेळी वकीलबार संघटनेचे अध्यक्ष बी.बी.साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. हेमंत भगवान यांनी केला.

  • या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. कमलाकर जाधव,उपप्राचार्य प्रा. जयंत भोसले,प्रा.सरस्वती वायबसे,डॉ.ईश्वर राठोड,डॉ. मीनाक्षी जाधव,प्रा.अर्चना मुखेडकर,प्रा.राघवेंद्र ताटीपामूल, प्रा.नितीन अंकुशराव,डॉ.हेमंत चांदोरे,प्रा.बालाजी वाघमारे,प्रा.
    शाहरुख शेख,साजिद शेख व चांगदेव खंदारे यांची उपस्थिती होती.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिराचे आयोजक लेफ्टनंट डॉ. के. डब्ल्यू. पावडे यांनी केले.सूत्रसंचालन डॉ. वर्षा सरवदे यांनी केले, तर आभार डॉ. नामानंद साठे यांनी मानले.
    शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे अधीक्षक हनुमंत जाधव,सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे,संतोष मोरे,अभिमन्यू हाके, मनोज इंगळे तसेच रेणुका ब्लड बँक,धाराशिव येथील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
error: Content is protected !!