कळंब – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्रासह कळंब तालुक्यात शोककळा पसरली आहे.या पार्श्वभूमीवर येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात शोकसभेचे आयोजन करून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांनी दादांच्या निधनाबाबत तीव्र दुःख व्यक्त करत सांगितले की, “अजितदादांसारख्या कणखर, धडाडीच्या आणि विकासोन्मुख नेतृत्वाचे जाणे ही महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रासाठी कधीही भरून न निघणारी हानी आहे.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि पवार कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो.” या शोकसभेस प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,उपप्राचार्य के.डी.जाधव यांच्यासह प्रमुख उपस्थितीत डॉ. डी.एन.चिंते,प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी,प्रा.डॉ.के.डब्लू.पावडे,डॉ. दादाराव गुंडरे,डॉ.एन.जी.साठे,प्रा. डॉ.आर.व्ही.ताटीपामुल,डॉ. श्रीकांत भोसले,प्रा.अर्चना मुखेडकर उपस्थित होते.तसेच प्रबंधक हनुमंत जाधव,अरविंद शिंदे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी “दादा! तुम्ही आमच्या हृदयात कायम राहाल,” अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
More Stories
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू
रॉकेल वाटपाचा मोठा निर्णय; आता एका रेशन कार्डवर ३ लिटरच मिळणार!
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी