धाराशिव (जिमाका) – २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी होऊन भारत एक प्रजासत्ताक देश बनला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस देशभर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.यावर्षी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा समारंभ धाराशिव जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पोलीस मुख्यालय मैदान क्र.२ येथे सोमवार, दि.२६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजता होणार आहे. सकाळी ९.३५ ते ९.५० या वेळेत पोलीस परेड व चित्ररथ संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.५० ते १०.१० या कालावधीत जिल्हास्तरावर व तालुकास्तरावरून सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांचा देशभक्तीपर गीतांवर आधारित एकत्रित सामूहिक कवायत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.त्यानंतर सकाळी १०.१० ते १०.२५ या वेळेत पालकमंत्री सरनाईक हे स्वातंत्र्य सैनिकांना भेट देऊन त्यांना शुभेच्छा देणार आहेत.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान