कळंब – येथील कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य पवन कुमार कुलकर्णी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव प्रणव नरहिरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.आशा नरहिरे यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा देत जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे महत्त्व विशद केले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा परिधान करून आपल्या भाषणातून स्वराज्यनिष्ठा,राष्ट्रप्रेम तसेच भारतीय संस्कृतीचे जागतिक दर्जाचे श्रेष्ठत्व प्रभावीपणे मांडले. विशेष म्हणजे कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. यावेळी धावारे बंधू व विद्यार्थ्यांच्या चमूने जिजाऊ वंदना तसेच स्वामी विवेकानंद यांच्यावरील प्रेरणादायी गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या सांस्कृतिक विभागातील सर्व कर्मचारी व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
More Stories
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू
रॉकेल वाटपाचा मोठा निर्णय; आता एका रेशन कार्डवर ३ लिटरच मिळणार!
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी