March 26, 2026

श्रमसंस्कारातून शाश्वत विकासाचा मार्ग – डॉ.अशोकराव मोहेकर

  • महाविद्यालयाच्या रासेयो विशेष शिबिराची उत्साहात सुरुवात
  • कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर आणि शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन डीकसळ (ता.कळंब) येथे उत्साहात पार पडले.
    राष्ट्रसंत गाडगे महाराज व मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ‘पाणलोट व पडीक जमिनीचा चिरंतन विकास’ या केंद्रभूत विषयावर शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे.
    कार्यक्रमाचे उद्घाटन रासेयो जिल्हा समन्वयक धाराशिव विभागाच्या डॉ.मनीषा कळसकर यांच्या हस्ते झाले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या,“राष्ट्रीय विकासात विद्यार्थ्यांची भूमिका मोलाची असून पर्यावरण-संवर्धनासोबत समाजाचा समतोल साधल्यानंच राष्ट्रनिर्मिती शक्य आहे.”
    प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर साहेब म्हणाले,विद्यार्थ्यांनी मोबाईलपुरते मर्यादित न राहता पुस्तक केंद्रीत व्हावे. व्यक्तिमत्त्वविकासासाठी रासेयोसारखी व्यासपीठे उत्तम संधी देतात.
    प्राचार्य डॉ.भगवान यांनी अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थ्यांनी आत्मकेंद्री न होता ज्ञानकेंद्री बनण्याचे आवाहन केले. पर्यावरण–समाज–विद्यार्थी या त्रिवेणी संगमातून समृद्ध भारताचा विकास साधता येईल,असेही त्यांनी सांगितले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. ताटीपामुले यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.डॉ.वर्षा सरवदे यांनी तर आभार प्रा.अंकुशराव यांनी मानले.विविध मान्यवर, प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    उपप्राचार्य डॉ.के.डी.जाधव, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.हेमंत चांदोरे आदींचे विशेष सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयीन कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले.
error: Content is protected !!