खामसवाडी – खामसवाडी येथील आई रोकडेश्वरी मंदिर परिसरात कृष्णा हॉस्पिटल,ढोकी रोड कळंब यांच्या वतीने मोफत आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.सकाळी ठीक ९ वाजता शिबिराचे उद्घाटन गावचे उपसरपंच दयानंद पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ.एन.आर.रेड्डी,डॉ. अविनाश तांबारे,मुख्याध्यापक बालाजी आल्टे,सतीश माने,औदुंबर धोंगडे,पप्पू पाटील, शरद शेळके,शिरसाट व तुषार वाघमारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या शिबिरामध्ये दमा,हृदयरोग, किडनीचे आजार,डायबिटीस, पोटाचे विकार,हाडांचे विकार आदी आजारांवर मोफत तपासणी व औषधोपचार करून देण्यात आले.गावातील शेकडो गरजवंत नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टरांचा स्टाफ तसेच गावातील तरुणांनी मोलाचे सहकार्य केले. आयोजकांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक कौतुक करण्यात येत आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड