कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सलंग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो/आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनानिमित्त शनिवार दि.३ जानेवारी २०२६ रोजी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन रासेयो विभाग प्रमुख प्रा.मनिषा कळसकर,प्रा.अभिमान ढाणे,डॉ.विद्युलता पवार, सौ.सुनिता चोंदे व प्रा.जोशी यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमा प्रसंगी डॉ.मनिषा कळसकर यानी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्या विषयी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुनीता चोंदे यांनी केले.सुत्रसंचालन अभिमान ढाणे यांनी केले.आभार प्रा.राजाभाऊ चोरघडे यानी मानले.यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी