
कळंब- शहरातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे दि.६ डिसेंबर २०२३ रोजी महामानव परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या स्मृती दिनानिमित्त उद्यानातील पूर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी कळंबचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष भोजने,राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर,तालुका अध्यक्ष निलेश पांचाळ,कल्याण कुंभार,अँड.मंगेश अष्टेकर,सचिन डोरले,टी.जी.माळी,ज्ञानेश्वर तोडकर,अरुण माळी,सुहास दराडे,किशोर पिसे,सतीश जाधवर,बजरंग गिरी,अशोक शिंपले,लोकरे, अशोक चिंचकर, तानाजी गोरे, गिरी यांचे सह यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर