कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तथा मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल,कळंब येथे अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा कळंब यांच्या वतीने साने गुरुजी जयंतीनिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.मराठी विभाग प्रमुख तथा कथामाला तालुकाध्यक्ष सोपान पवार यांनी ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केली. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत एकूण ४३५ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.उपक्रमास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.विद्यार्थ्यांमध्ये सुंदर हस्ताक्षराची आवड निर्माण करणे,शुद्धलेखनाची सवय लावणे, अक्षरांची स्पष्टता व शब्दरचना सुधारण्याचा उद्देश या स्पर्धेमागे होता. स्पर्धेत प्रथम तीन विजेते व तीन उत्तेजनार्थ विद्यार्थी यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.या उपक्रमासाठी आप्पासाहेब वाघमोडे,संजय मडके तसेच येळे मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड