March 26, 2026

CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v80), quality = 60?

लातूर–कल्याण महामार्गाचा मार्ग ठरविण्याची जबाबदारी सरकारवर;दोन्ही जिल्ह्यांची उत्सुकता शिगेला!

  • कळंब – महाराष्ट्र सरकारने नुकत्याच झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात लातूर–कल्याण जनकल्याण द्रुतगती महामार्गाची घोषणा केली असून या महामार्गामुळे मराठवाड्याच्या विकासाला गती मिळणार असल्याने निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.मात्र,हा महामार्ग अहिल्यानगर (नगर) पर्यंत कोणत्या मार्गाने न्यावा यावर बीड व धाराशिव जिल्ह्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
    बीड जिल्ह्याची मागणी लातूर–अंबाजोगाई–केज–पाटोदा मार्गे महामार्ग न्यावा अशी असताना,धाराशिव जिल्ह्याची ठाम मागणी लातूर–तांदुळजा–शिराढोण–
    कळंब–ईटकुर–खर्डा–जामखेड–अहिल्यानगर या सरळ,कमी अंतराच्या आणि दोन्ही जिल्ह्यांना समान लाभ देणाऱ्या मार्गाने महामार्ग न्यावा अशी आहे.
    या मार्गाने गेल्यास बीड जिल्ह्यातील चार तर धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुक्यांना थेट लाभ मिळणार असल्याचे धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांचे मत आहे. तसेच खर्च,अंतर व वेळ कमी होणार असल्याचे मुद्देही मांडले जात आहेत.
    आता या महामार्गाबाबत सरकार कोणता निर्णय घेते, बीड–धाराशिव जिल्ह्यांना समान न्याय मिळणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  • 🛑 हा महामार्ग फक्त धाराशिव जिल्ह्याला लाभ देत पुढे गेला पाहिजे अशी आत्मकेंद्री भूमिका धाराशिव जिल्ह्यातील जनतेची नाही उलट बीड आणि धाराशिव जिल्ह्याला समान लाभ देणारा महामार्ग निर्माण व्हावा अशीच रास्त भूमिका धाराशिव जिल्ह्यातील जनतेची आहे.
    आता खरा प्रश्न आहे की लातूर कल्याण जनकल्याण महामार्गाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन काय निर्णय घेणार आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
  • विश्वनाथ (अण्णा) तोडकर, निमंत्रक – लातूर कल्याण जनकल्याण दृत गती महामार्ग जिल्हा धाराशिव
    अध्यक्ष,
    महाराष्ट्र लोक विकास मंच.
    छत्रपती संभाजी नगर.

error: Content is protected !!