June 23, 2025

युवा महोत्सवात सामाजिक संस्था,नाट्य परिषद,सांस्कृतिक मंडळ व महिलांचा सहभाग

  • धाराशिव (जिमाका) – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्हास्तर युवा महोत्सव 2023 चे आयोजन 5 डिसेंबर 2023 रोजी छत्रपती शिवाजी नाट्यगृह येथे करण्यात आले होते. या युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन व नटराजाच्या मुर्तीचे पुजन करुन झाले.
    यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्राच्या वर्षा मारवळीकर, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी शुभम धुत, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विशाल शिंगाडे, परिक्षक मिलींद माने, सतीश ओव्हाळ, सुर्यकांत कापसे, श्रीराम नागरगोजे, विनोदकुमार वायचळ, शोभा कुलकर्णी, दिपक दहिफळे, एस.डी.भोसले, एस.टी. गांगुर्डे, संजय कोथळीकर तसेच विविध शाळा व महाविद्यालयातील युवक व युवती उपस्थित होते.
    संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 घोषित केले असल्याने राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर ही संकल्पना दिली होती. त्यानुसार कृषी विभागाने ॲग्रो प्रॉडक्टस्, हस्तकला शेतीसाठी आवश्यक साहित्याचे प्रदर्शनाचे स्टॉल लावण्यात आले होते. सामुहिक लोकनृत्य, वैयक्तीक लोकनृत्य, सामुहिक लोकगीत, वैयक्तीक लोकगीत, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, फोटोग्राफी आदीं बाबीमध्ये युवक-युवतींना सहभाग नोंदविला होता.
    या स्पर्धेत लोकगीतात प्रथम क्रमांक धनंजय शिंगाडे बहुजन सामाजिक संस्था, द्वितीय अखील भारतीय मराठी नाट्य परिषद तर तृतीय क्रमांक सम्राट नाट्य संस्था व सांस्कृतिक मंडळांनी पटकावला आहे.
    लोकनृत्यमध्ये प्रथम क्रमांक अखील भारतीय मराठी नाट्य परिषद, द्वितीय सम्राट नाट्य संस्था व सांस्कृतिक मंडळ तर तृतीय क्रमांक धनंजय शिंगाडे बहुजन सामाजिक संस्था यांनी पटकावला आहे.
    वक्तृत्व स्पर्धेत शेख समीर मजनु, कथा लेखनात इनामदार कृष्णाई महावीर, सोलो लोकगीतात वट्टे ओंकार बाळींग व सोलो लोकनृत्यात अंकिता माने यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक जगदीश सुतार, द्वितीय नम्रमा बनसोडे तर तृतीय क्रमांक श्रेया गिरवलकर यांनी पटकावला आहे. फोटोग्राफीत प्रथम क्रमांक मोरे आदित्य, द्वितीय मृणाली शिंदे तर तृतीय क्रमांक विरुटकर समीर केशव यांनी पटकावला आहे. हस्तकला स्पर्धेत प्रथम क्रमांक वैष्णवी अवताडे, द्वितीय शुभांगी जावळे तर तृतीय क्रमांक मृणाली शिंदे. ॲग्रो प्रोडक्टमध्ये प्रथम क्रमांक इनामदार कृष्णाई, द्वितीय लोंढे संजीवनी तर तृतीय क्रमांक मृणाली शिंदे यांनी पटकावला आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी कळ‍विले आहे.
error: Content is protected !!