February 8, 2026

पिंपळगाव डोळा ग्रामस्थांची मोठी दानशूरता;१० एकर गायरान जमिनीतून शासकीय रुग्णालयासाठी मार्ग मोकळा!

  • पिंपळगाव (डोळा) –पिंपळगाव (डोळा) येथील ग्रामस्थांनी दाखवलेल्या दुर्मिळ दानशूरतेमुळे शासकीय रुग्णालय उभारणीचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. गावातील गायरान जमीनीपैकी तब्बल १० एकर जमीन शासनाच्या ताब्यात देत रुग्णालय उभारणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.मात्र,त्याच रुग्णालयाची मागणी कळंब शहरात झाली असता तेथे जागेची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याचे स्पष्ट झाले.
    या पार्श्वभूमीवर काँग्रेस आयचे भागवतराव धस यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान
    आरोग्यमंत्री प्रकाशजी अबिटकर यांची विशेष भेट घेत सविस्तर चर्चा केली. या चर्चेला आरोग्यमंत्र्यांनी अत्यंत पाॅझिटिव्ह प्रतिसाद देत तातडीने पुढील कार्यवाहीसाठी सकारात्मक आश्वासन दिले.
    पिंपळगाव (डोळा) ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने केलीली जमीन उपलब्धता ही संपूर्ण तालुक्यासाठी आदर्श ठरत असून, या दूरदृष्टीपूर्ण आणि जनहिताच्या कार्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने भाऊंचा मनःपूर्वक सत्कार आणि आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
    ग्रामस्थांच्या या उपक्रमामुळे भविष्यात ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
error: Content is protected !!