कळंब – कळंब तालुक्यातील गोविंदपुर-खामसवाडी-मोहा या मार्गावरील अरुंद रस्त्यामुळे तसेच साईड पट्टी व त्यावरील झाडे झुडपे वाढल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होत असून बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. कळंब तालुक्यातील खामसवाडी- मोहा या गावी गुळ पावडर चे कारखाने असल्याने सदरील कारखान्यांना गोविंदपुर -खामसवाडी-मोहा या मार्गावरून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे.मोहा- खामसवाडी या मार्गावरून तेरणा कारखाना ढोकी,नॅचरल कारखाना रांजणी, तडवळा आदी कारखान्यांनाही याच मार्गावरून ऊस वाहतुकीची वाहने जात असल्याने अनेक रस्ते उखडले आहेत.गेल्या वर्षी गोविंदपुर – खामसवाडी या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झालेले आहे.परंतु साईड पट्टी या रस्त्यावर अरूंद असल्याने व काही ठीकाणी झाडे झुडपे वाढल्याने ईतर वाहनांसाठी बाजु देणे अवघड झाले आहे.नागझरवाडी पाटी पासुन मोहा पर्यंतच्या रस्त्याचे काम झालेले नसल्याने हा रस्ता अतिशय खराब झाला असुन जागोजागी गुडघाभर खड्डे पडले आहेत. त्यामुळे उस भरतीचे वहान चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गोविंदपुर-खामसवाडी रस्त्यावर गेल्या आठवड्यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना समोरचे काही न दिसल्याने ट्रॅक्टर ऊस ट्रॉलीसह रस्त्यावर आडवा झाला.सदरील ट्रॅक्टर चालकाने उडी दुर्दैवी घटना टळली. तर याच अपघाती उसाच्या ट्रॅक्टरला दुचाकी स्वराची धडक बसल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याचे कळते.तसेच खामसवाडी येथील साठे चौक हे अत्यंत संवेदनशील अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे.कारण या चौकात उतार व चढ जागेवरच असल्याने चढावरील वहान वर चढत असताना रिव्हर्स येण्याचे प्रमाण वाढले असुन अशा परिस्थितीत एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर याच चौकात महामंडळाच्या एसटी बसेस ही थांबतात.यामुळे बाहेरगावी जाणारी विद्यार्थी प्रवासी येथे थांबलेले असतात. त्यामुळे या चौकामध्ये असणारा चढ व उतार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तात्काळ भरुन घेऊन त्याची उंची वाढवावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थ व प्रवासी यांच्यातून होत आहे.
गोविदपुर -खामसवाडी-मोहा या रस्त्यावरील सर्व पुलाची उंची वाढवुण घ्यावी कारण सदरील पूल हे गेल्या अनेक वर्षापासून उचलून घेतलेले नाहीत त्यामुळे पावसाळ्यात थोडा जरी पाऊस पडला तरी या पुलाला मोठ्या प्रमाणात पाणी येऊन वाहतूक व्यवस्था बंद होते.तर उसाचा हंगाम चालू झाल्यास ऊस वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे सदरील सर्वच पुलांची उंची वाढवणे आवश्यक आहे.अन्यथा असेच अपघात दररोज घडत राहतील.
— हनुमंत भाऊ पाटुळे मानव अधिकार आंदोलन संघटना (संस्थापक अध्यक्ष)
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन