कळंब – राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष,आपलं घर नळदुर्ग संस्थेचे आधारस्तंभ आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा (वय ९३) यांचे २ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता नळदुर्ग येथून सोलापूरला नेत असताना वाटेत दुःखद निधन झाले. आज, दि.३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी त्यांचे देहदान सोलापूर सिव्हिल मेडिकल कॉलेज येथे करण्यात येणार आहे. पन्नालाल भाऊ हे दैनिक मराठवाडाचे माजी संपादक, ग्रामोदय समिती कुर्डवाडीचे अध्यक्ष,तडफदार समाजवादी विचारवंत,साहित्यिक आणि प्रभावी वक्ते होते. त्यांच्या जाण्याने समाजवादी चळवळीचा एक मजबूत आधारवड हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. सा.साक्षी पावनज्योत व प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
More Stories
“रस्ते की मृत्यूचे सापळे?” — अतिक्रमणखोर मोकाट,प्रशासन झोपेत;कळंबमध्ये महिलेचा चिरडून मृत्यू
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”
कळंब बाजार समितीचे ४६ गाळे फक्त खुल्या लिलावातूनच