February 8, 2026

यशवंतराव चव्हाण हे राजकारणातील विकास दृष्ट्या प्रगल्भ नेते होते – मुख्याध्यापक सुरेश टेकाळे

  • भाटशिरपूरा – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील अग्रणी व्यक्तिमत्त्व,तसेच देशाचे माजी उपपंतप्रधान,गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून देशसेवेत अमूल्य योगदान देणारे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कै.भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय,भाट शिरपूरा येथे दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश टेकाळे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात चव्हाण यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून व पुष्पांजली वाहून करण्यात आली.
    याप्रसंगी मुख्याध्यापक टेकाळे म्हणाले की,“यशवंतराव चव्हाण हे राजाच्या राजकारणातील विचारवंत विकासदृष्ट्या प्रगल्भ नेते होते.त्यांच्या अफाट दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र आणि देशाने प्रगतीची नवी दिशा पाहिली.विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शातून नेतृत्व,शिस्त आणि समाजसेवेची प्रेरणा घ्यावी.”
    व त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्य,विचार आणि व्यक्तिमत्त्वाची माहिती देण्यात आली.
    कार्यक्रमास शिक्षक एस.जी. सूर्यवंशी,बी.व्ही.ओव्हाळ,एस. एस. ढिकले, एच.ए.पानढवळे, सर्व विद्यार्थी,शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!