February 8, 2026

कळंब येथे मतदार जागृती रॅलीचे भव्य आयोजन

  • कळंब* – नागरिकांमध्ये मतदानाचे महत्त्व जागृत करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी आणि तहसील कार्यालय,कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता मोठ्या उत्साहात मतदार जागृती रॅली आयोजित करण्यात येत आहे. रॅलीची सुरुवात तहसील कार्यालयातून होणार असून स्थानिक शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवक आणि रोटरी सदस्य सहभागी होऊन नागरिकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचवतील.
    या उपक्रमाचे आयोजन तहसीलदार हेमंत ढोकळे यांच्या सूचनांनुसार व मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून,रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे अध्यक्ष रो. डॉ.अभिजीत जाधवर आणि सचिव रो.श्याम जाधवर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाची प्रभावी आखणी करण्यात आली आहे. यासोबतच प्रकल्प प्रमुख रो.रवि नरहिरे आणि रो.अरविंद शिंदे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, शाळांशी समन्वय तसेच जनजागृती उपक्रमांची रचना यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.
    मतदार जागृती रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमार्फत घोषवाक्ये, फलक आणि संदेशांच्या सहाय्याने नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करणे आवश्यक असून, या उद्देशाने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
    नागरिक, पालक, तसेच सर्व सामाजिक घटकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मतदानाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
error: Content is protected !!