कळंब – कळंब नगर परिषद नगराध्यक्षा (सर्वसाधारण महिला) व २० नगरसेवक निवडणूक २०२५ ची नामनिर्देशन प्रक्रिया जोरात झाली असून १० नोव्हेंबरपासून नामनिर्देशन दाखल करण्यास प्रारंभ झाला होता. दि.१७ नोव्हेंबर पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकूण १४ उमेदवारांनी १६ नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. नगरसेवक पदासाठी १० प्रभागातील अ व ब मिळून २० जागांसाठी तब्बल २०७ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली असून वातावरणात मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाने १६ नोव्हेंबर हा रविवार सुट्टीचा दिवस जाहीर केला होता,मात्र उमेदवारांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सुट्टी रद्द करत अर्ज स्वीकारण्यात आले. नगराध्यक्षा पदासाठी दाखल झालेले अर्ज – सौ.राणी उर्फ सुनंदा शिवाजी कापसे (शिवसेना),सौ.शेख शेहनाज अनिस (राष्ट्रवादी),सौ.ज्योती प्रकाश सपाटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस),सौ.मिराबाई भागवत चोंदे (राष्ट्रवादी),सौ.धनश्री रुपेश कवडे (शिवसेना – उबाठा) दिनांक १६ नोव्हेंबर रोजी दाखल अर्ज– सौ.आशा सुधीर भवर (उबाठा),सौ.रश्मी संजय मुंदडा (उबाठा),सौ.मनीषा सतपाल बनसोडे (अपक्ष),दिनांक १७ नोव्हेंबर – शेवटचा दिवस – प्रा.डॉ.मीनाक्षी श्रीधर भवर (राष्ट्रवादी काँग्रेस – दोन्ही गट), अमरीन जावेद खान (अपक्ष),सौ.कविता निवृत्ती गोरे (अपक्ष),नूरजहान नसरुद्दीन शेख (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),सौ.नेहा दत्ता भांडे (अपक्ष). २१ नोव्हेंबर रोजी फॉर्म माघारी घेण्याचा अंतिम दिवस असून किती उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात राहणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. कळंब नगर परिषद निवडणुकीत मोठी चुरस रंगण्याची चिन्हे जोरात दिसत आहेत.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन